उंद्रीत महिला उद्योजकांचा उत्साह; ‘राईज अँड शाइन’कडून फ्ली मार्केटला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: उंद्री परिसरात ‘राईज अँड शाइन वुमेन्स क्लब’तर्फे आयोजित फ्ली मार्केटला महिला उद्योजक आणि नागरिकांकडून…
पुणे: उंद्री परिसरात ‘राईज अँड शाइन वुमेन्स क्लब’तर्फे आयोजित फ्ली मार्केटला महिला उद्योजक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून महिलांना त्यांच्या व्यवसायाचे प्रदर्शन आणि विस्तार करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. संस्थापक सौ. सुप्रिया कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. टीममधील मनीषा भुजबळ आणि अनीता मॅगिलाम्पू यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. विविध आकर्षक स्टॉल्समधून…
पुणे :पत्रकारिता आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम साधणारा एक तरुण आज महाराष्ट्रात प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. स्वतःच्या वार्षिक उत्पन्नातील तब्बल २० टक्के रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करणारे समाधान भागवत काटे गेल्या दहा वर्षांपासून आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, कला आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देत आहेत. त्यांनी ‘कर्तव्यदक्ष आणि समाजभान जपणारा पत्रकार’ अशी ओळख निर्माण…
पुणे: अवकाळी पावसामुळे कर्वे रोड परिसरात झालेल्या जलसंचयामुळे कोथरूडमधील डीपी रोडवरील ओढ्यावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाकडे पुणे महानगरपालिकेचे लक्ष वेधले गेले आहे. प्रभाग ३१ मधील या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते रोहित मारणे यांनी स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेचे भेलके यांच्यासोबत महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांना निवेदन देऊन…
पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करून तिथे उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील नेहमीच ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या याच माणुसकीच्या ओलाव्यामुळे कोथरुडमधील असंख्य नागरिक त्यांच्याकडे एका हक्काच्या पालकाप्रमाणे पाहतात. आज त्यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील अनेक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत…
पुणे: पुणे महानगरपालिका (पीएमसी) अंतर्गत देण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या कंत्राटात ‘जय शंकर टेंडर’ कंपनीबाबत अनियमिततेच्या चर्चांना उधाण आले आहे. संबंधित कंत्राटात उच्चपदस्थ अधिकारी किंवा प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप असल्याची चर्चा रंगू लागली असून, कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनातील तफावत आणि देयकांच्या विलंबामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य सरकारच्या प्रचलित नियमांनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुमारे ३० हजार…
पुणे : पुण्याच्या कोथरूड परिसरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट होत असल्याचे गंभीर वास्तव समोर येत असून, याविरोधात युवासेना रोहित मारणे आक्रमक भूमिकेत उतरले आहेत. नामांकित बिल्डरांनी बनावट कागदपत्रे व नियमांना बगल देत बेकायदा इमारती उभारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे परिसराचा नियोजित विकास धोक्यात आला असून पर्यावरणीय संतुलनावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मारणे यांनी…
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघालेल्या विमानाचे लँडिंग होताना अपघात झाला, ज्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर भावुक…
पुणे:कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरातील स.नं.८४/१६५ या जागेवर राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच शिवसेनेचे नेते रोहित मारणे व मंगल सोनटक्के यांनी केला आहे. झोपडपट्टी धारकांच्या अंतिम पात्रता यादीत फेरफार करून अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे प्रामाणिक व…
पुणे:कोथरूड परिसरात काही बांधकाम व्यावसायिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे अवैध इमारती उभारल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते रोहित मारणे यांनी केला आहे. या प्रकरणासंदर्भात त्यांनी ठोस पुरावे गोळा केल्याचा दावा करत, प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “कोथरूडमध्ये अनेक ठिकाणी नियमबाह्य बांधकामे झाली असून, काही ठिकाणी खोटे दस्तऐवज वापरल्याचे स्पष्ट पुरावे आहेत….
डीईएस पुणे विद्यापीठात शिक्षण विद्याशाखेचे भव्य उद्घाटन पुणे : शिक्षण प्रक्रियेत माहिती आणि बुद्धिमत्तेची समृद्धी दिसून येत असली तरी ज्ञानकेंद्रित दृष्टिकोनाच्या अभावामुळे परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया अवरुद्ध झाली आहे. यासाठी शिक्षणाच्या सर्व स्तरांवर पुनर्मूल्यांकन अपरिहार्य आहे, असे सखोल मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. डीईएस पुणे…